बांदा : बीएसएनएल टॉवरमधून २४ बॅटऱ्यांची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

शेअर करा

रोणापाल येथील फायबर केबिनचे कुलूप तोडून २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास; बांदा पोलिसांकडून तपास सुरू.

बांदा ,दि.०४ जुन
रोणापाल येथे असलेल्या बीएसएनएल कंपनीच्या टॉवरमधील फायबर केबिनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २४ हजार रुपये किमतीच्या २४ बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनापाल येथील मोबाईल टॉवरच्या फायबर केबिनचा दरवाजा फोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर अमरराजा कंपनीच्या वापरातील २४ ड्राय बॅटऱ्या लंपास केल्या. चोरीस गेलेल्या प्रत्येक बॅटरीची किंमत सुमारे एक हजार रुपये असून एकूण २४ हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे.


ही घटना २ जून रोजी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले असून याबाबत कंपनीचे पेट्रोलिंग ऑफिसर सुहास दत्ताराम चव्हाण (रा. वेरळ, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास बांदा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींची पडताळणी सुरू बांदा पोलीस पुढील तपासणी करीत आहेत.

शेअर करा