बांदा : इन्सुलीत श्री देवी माऊलीचा वार्षिक वीणा सप्ताह रविवारपासून

शेअर करा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; सोमवारी पालखीफेरीने सप्ताहाची सांगता

बांदा,दि.२२ ऑगस्ट
इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक वीणा सप्ताह रविवार दिनांक २३ अ‌ॉगस्ट पासून दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सदरच्या हरिनाम सप्ताहात डोबाचीशेळ, क्षेत्रफळ, कोठावळेबांध, सावंतटेब, कुडवटेंब, पागावाडी व बिलेवाडी भजन मंडळे भजने सादर करतील. सोमवारी २४ रोजी दुपारी १२ वाजता पालखीफेरीने विविध धार्मिक कार्यक्रमानंतर सप्ताह सोहळ्याची सांगता होईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती इन्सुली, मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा