बांदा : बांदा पोलिसांची अवैध मद्यवाहतुकीवर मोठी कारवाई; १.३६ कोटींचा मुद्देमाल जप्त

शेअर करा

चेकनाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला; पुण्यातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

बांदा,दि.१३ जून
बांदा पोलीसांनी अवैध मद्यवाहतुकीविरोधात मोठी कारवाई केल्याने दारू माफीयांचे धाबे दणाणले आहेत, बांदा चेकनाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडून तब्बल १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुणे येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे बांदा चेकनाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना तपासणी साठी संशयित ट्रकची थांबवून पाहणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतूक करत असल्याचे आढळून आले. यावेळी ट्रक मध्ये विविध प्रकारच्या गोवा बनावटीच्या हजारो बाटल्या आढळून आल्या.


कारवाईदरम्यान सुमारे १५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक तसेच १८० मिली आणि ७५० मिली क्षमतेच्या गोवा बनावटीच्या व्हिस्कीच्या एकूण ७० हजारांहून अधिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या १ कोटी २१ लाखाच्या दारू साठ्यांसह ट्रक असा एकूण १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी भारत संदिपान जाधव (वय 31, राहणार पुणे ) पुढील तपास बांदा पोलीस करीत आहेत .


ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार विलास भोगले, रामचंद्र तेली, पोलीस कर्मचारी सुशांत हिर्लेकर, बर्गे, हवालदार सिद्धार्थ माळकर, राजेश गावस, दादा परब, राजाराम कापसे, प्रसाद पाटील रोहित कांबळे यांनी केली .

शेअर करा