बांदा : बांद्याचा बाप्पा गणेश मंडळ अध्यक्षपदी भाऊ वाळके यांची निवड

शेअर करा

बांदा,दि.२८ जून
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा बांद्याचा बाप्पा सन 2026 ची उत्सव नियोजन बैठक शनिवार दिनांक 27 जून रोजी श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे पार पडली. यावेळी नवीन उत्सव कमिटी स्थापन करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, उपाध्यक्षपदी निलेश उर्फ पापु कदम, सचिवपदी गौरव नाटेकर तर खजिनदारपदी निखिल मयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच यावर्षी रक्तदान शिबिर तसेच शेतकऱ्यांसाठी काजू सुपारी कलम वाटप आदींसह विविध कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात. यावेळी मंडळाचे आजी माजी पदाधिकारी ,गणेशभक्त कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा