Kudal News:भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी; पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील यांचे प्रतिपादन

शेअर करा

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त कार्यशाळा; लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कुडाळ,दि.२९ ऑक्टोंबर

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे प्राध्यापक विद्यार्थी यांच्यावतीने समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यशाळेमध्ये प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
यावर्षी भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह दिनांक 26 ऑक्टोंबर ते दिनांक 1 नोव्हेंबर या मुदतीत साजरा करण्यात येत आहे. संकल्पना आहे ‘सत्य निष्ठेतून समृद्धीकडे ‘ भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देशासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली सत्यनिष्ठा हीच आपल्या समृद्ध समाजाची खरी ताकद आहे हे दाखवून द्या आणि निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधा. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग मध्ये संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064, संपर्क क्रमांक 02362 -222289, तसेच व्हाट्सअप क्रमांक 9922891064 यावर संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन कारण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. स्मिता सूरवसे, प्राध्यापक आवटी, प्राध्यापक चव्हाण तसेच इतर प्राध्यापक व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस निरीक्षक दीपक माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत, अंमलदार प्रितम कदम, विजय देसाई, गोविंद तेली, महेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंढे, नागेश खोत आदी उपस्थित होते.

शेअर करा