भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे निमित्त
कुडाळ,दि.२९ ऑक्टोंबर
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने भ्रष्टाचारमुक्त देश बनवण्यासाठी विद्यार्थ्यांदशेपासूनच विद्यार्थ्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती व्हावी, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे, याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळ हायस्कूल जूनियर कॉलेज कुडाळ येथे आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता “भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी जुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक वराटे, उपमुख्याध्यापक तेली, प्रशाळेचे शिक्षक पवार, शिक्षक साळवी यांच्या तसेच संस्थेच्या सहकार्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपधीक्षक संगीता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस निरीक्षक दीपक माळी व सहकारी यांनी उपस्थित राहून निबंध स्पर्धा पार पाडली.
निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक- कुमारी अनुष्का संतप्रसाद परब, द्वितीय क्रमांक- कुमारी कोमल विनोद प्रभू, तृतीय क्रमांक कुमारी लावण्या प्रशांत मेस्त्री, तसेच उत्तेजनार्थ म्हणून सांगवी पांडुरंग सरमळकर यांना बक्षीसे व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह दि. २६ ऑक्टोबर ते दि. १ नोव्हेंबर या मदतीत साजरा करण्यात येत आहे. याची संकल्पना “सत्य निष्ठेतून समृद्धीकडेभ” भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देशासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली सत्यनिष्ठा हीच आपल्या समृद्ध समाजाची खरी ताकद आहे हे दाखवून द्या आणि निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधा. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गमध्ये संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, संपर्क क्रमांक ०२३६२२२२२८९ तसेच व्हाट्सअप क्रमांक ९९२२८९१०६४ यावर संपर्क साधण्याचे जाहीर आवाहन देखील करण्यात आले.