बांदा : गोव्यातील भीषण अपघातात डिंगणे येथील महादेव सावंत यांचा जागीच मृत्यू

शेअर करा

माशेल येथे सकाळी भीषण अपघात; बांदा तालुक्यावर शोककळा, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

बांदा,दि.०६ ऑगस्ट
डिंगणे येथील महादेव चंद्रकांत सावंत (वय ४५) यांचा गोव्यातील माशेल येथे झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

महादेव सावंत हे दुचाकीवरून डिंगणे येथून गोव्यात नेहमीप्रमाणे कामावर जात असताना समोरून येणाऱ्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर गोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिस पुढील तपास सुरू आहे.

महादेव सावंत यांच्या निधनाने डिंगणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

शेअर करा