बांदा,दि.११ ऑगस्ट
व्हिओएम कोअर राज्य कमिटीच्या सदस्यपदी तसेच शिवशंभू प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार जय भोसले यांचा बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जय भोसले यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी उपसरपंच रत्नाकर आगलावे,माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर,ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,सौ.रुपाली शिरसाठ,सौ.श्रेया केसरकर,सौ.दीपलक्ष्मी पटेकर,प्रशांत बांदेकर उपस्थित होते.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्यांनी जय भोसले यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.