बांदा : आरोंदा येथे १५ रोजी संयुक्त दशावतार ‘महायोद्धा इरावन’ नाट्यप्रयोग

शेअर करा

बांदा ,दि. १० जून
आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिरात सोमवार १५ जून रोजी रात्री ८ वाजता भव्य दिव्य संयुक्त दशावतार, सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग ‘महायोद्धा इरावन’ आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यप्रयोगाला विशेष सहाय्य मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मोरे यांचे आहे. सर्व नाट्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरोंदा ग्रामस्थांनी केले आहे

शेअर करा