बांदा :वाफोलीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

शेअर करा

बांदा,दि.२६ जून



पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाफोलीचे उपसरपंच विनेश गवस यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाफोली क्रमांक 1 व 2 येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत वह्या स्वीकारल्या.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी उपसरपंच विनेश गवस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

शेअर करा