बांदा,दि.०६ ऑगस्ट
सामाजिक, सांस्कृतिक आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सावंतवाडी सरमळे येथील संजय कृष्णा गावडे यांची ‘राष्ट्रीय संगीत रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. कोकण बुक ऑफ रेकॉर्ड आणि यशश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन – सिंधुदुर्गनगरी २०२६’ या सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, पत्रकार भवन, जिल्हा सिंधुदुर्ग बँकेजवळ, ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या निवडीबद्दल विविध स्तरांतून संजय गावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.