बांदा : गणेश चतुर्थीनिमित्त विशेष वाहतूक नियोजन

शेअर करा

१२ ते १३ सप्टेंबरदरम्यान बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन

बांदा,दि.११ सप्टेंबर
बांदा बाजारपेठेतील गणेश चतुर्थी गर्दी लक्षात घेऊन बांदा पोलीस ठाण्याने दि. 12 ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.

यामध्ये दोन मार्गावर एकेरी वाहतूक लागू करण्यात आली आहे. पहिला मार्ग बांदेश्वर मंदिर चौक – संभाजी चौक – मोयेवाडा तेलीतीठा – आळवाडा तिठा मार्गे शिवाजी चौक हॉस्पिटल कट्टा असा राहील. दुसरा मार्ग तलाठी कार्यालय गांधी चौक – जि.प. शाळा – बोद्रे दुकान – गुरु मेस्त्री
घरमार्गे बाहेर पडेल.

तसेच चार ठिकाणी बॅरिगेटिंग करून तीन व चार चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. संभाजी चौक ते गांधी चौक, घोडेमोडणी ते गांधी चौक, जुनी ग्रामपंचायत ते गांधी चौक आणि गुरु मेस्त्री घर ते घोडेमोडणी या रस्त्यांवर प्रवेश बंद राहील.

कन्या शाळेकडून येणारी वाहने खेमराज हायस्कूल मार्गे बाहेर जातील. पार्किंगसाठी बांदेश्वर मंदिर, आळवाडा मैदान, मातृत्व मेडिकल जवळील जागा आणि खेमराज हायस्कूल पटांगणात व्यवस्था केली आहे.
सर्व गणेश भक्त, ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले आहे.

शेअर करा