१० व ५ वर्षे अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या ३४ चालकांचा १५ ऑगस्टला सन्मान
देवगड,दि. १६ ऑगस्ट
राज्य परिवहन सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सुरक्षित सेवा बजावणाऱ्या चालकांचा १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रमावेळी बिल्ले व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. देवगड आगारातील एकूण ३४ चालकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
यामध्ये १० वर्षे सुरक्षित सेवा बजावलेल्या चालकांमध्ये दीपक वासुदेव परब, प्रशांत बाबू हळदणकर, संतोष धोंडू कोकरे, कल्पेश बाळकृष्ण कांबळे, अनिकेत लक्ष्मण इंदप, रमेश राजाराम तावडे, विकास विजय जाधव तसेच अनंत प्रकाश रावले यांचा समावेश आहे.
तर ५ वर्षे सुरक्षित सेवा बजावलेल्या चालकांमध्ये दीपक जानू खरात, प्रसाद शरद माळकडे, लक्ष्मण बाबासाहेब नागरगोजे, शिलरत्न सोपान पंडित, संदीप रामचंद्र कुंभार, चंदन सुरेश फोंडके, जानकीराम संग्राम मुसळे, रामदास विश्वनाथ केंद्रे, शिवाजी लक्ष्मण नागरगोजे, रजनीकांत गणेश नारिंग्रेकर, रतन केरबा मुंडे, नितीन अरुण सावंत, नामदेव मारुती वडगावे, सुबोध अरुण साटम, रामदास वैजीनाथ पाखरे, अशोक पुंडलीक जायभाये, तुकाराम भक्ताराम मुंडे, संदेश सुरेश साटम, जनार्दन राम दहीफळे, जावेद शरीफ धबाले, मनोज शिवदास कोळी, पंकज विलास पाटील, सुनील नवल कुंवर, सुभाष रामा जाधव, सुयश बाबाजी वाळवे व नाझीमअली मुस्ताकअली सैय्यद यांचा समावेश आहे.
या चालकांनी आपल्या सेवाकाळात सुरक्षित वाहनचालकतेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात आले.
