Sindhudurg News : आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही

शेअर करा

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा गर्भित इशारा ; डॉ. शिरोडकर हायस्कुल येथे संस्था पदाधिकारी व सिंधुदुर्गातील ज्ञाती बांधवांची महत्वपुर्ण बैठक


सिंधुदुर्ग, दि. १ नोव्हेंबर

क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईच्या 91 वर्ष जुन्या संस्थेवर ताबा मिळवण्याचा स्वप्निल फाटक यांच्यामार्फत आ. प्रसाद लाड प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी ज्ञाती बांधव यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभुमीवर डॉ. शिरोडकर हायस्कुल येथे संस्था पदाधिकारी व सिंधुदुर्गातील ज्ञाती बांधवांची महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर समाजाचे आराध्य दैवत डॉ. रामचंद्र शिरोडकर यांच्या पुतळ्यासमोर समाज बांधवांनी घटनेच्या पार्श्वभुमीवर आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली. आ. प्रसाद लाड, स्वप्निल फाटक यांना समाजाची संस्था कदापी बळकावु देणार नाही, असा इशारा संस्थेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अंकुश डगरे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे, सरचिटणीस भगवान लोके यांनी दिला आहे.
परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या सभागृहात क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई व क्षात्रकुलोत्पन्न मराठा (गावडे) समाज या दोन संस्थांची संस्थेवर स्वप्निल फाटक यांनी ताबा मिळवण्याच्या घटनेसंदर्भात संयुक्त बैठक शनिवारी 31 आॅक्टोंबर 2026 रोजी पार पडली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, विश्वस्त अध्यक्ष अंकुश डगरे,उपाध्यक्ष रामचंद्र वाळके, सेक्रेटरी भाऊ डगरे, खजिनदार चंद्रशेखर फाटक, उपचिटणीस अनिल वराडकर, सदस्य अनंत बांदिवडेकर, कार्यकारी सदस्य श्रीपाद फाटक, विश्वस्त सदस्य उदय फणसेकर, प्रदिप लुडबे, जनार्दन कुवेसकर, सुकानु समिती रविंद्र कुयेसकर, विलास कोठारकर, धर्माजी गावकर, अशोक घारकर, ॲड. दिपक डगरे, क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामू विखाळे, सरचिटणीस भगवान लोके, उपाध्यक्ष रविंद्र जोगल,गणेश गावकर, सहसचिव हनुमंत वाळके, भाई नरे, स्वप्नील चिंदरकर,विजय चिंदरकर,आतिश जेठे,श्यामसुंदर आचरेकर,सचिन लोके , विनय हडकर,नंदकिशोर गावडे,विजय वाळके,परेश आचरेकर,अनिल नरे , सुनील हरमलकर, सुनील रावले, विजय लोके, रामचंद्र ढोलम आदींसह समाज बांधव उपस्थित होते. यावेळी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा विजय असो, हम सब एक है, हमसे जो टकरायेगा मिठीं मे मिल जाएगा, संस्थेवर ताबा घेण्याचा प्रयत्न करणा-यांचा निषेध असो, डाॅ. शिरोडकर यांचा विजय असो, एच.डी.गावकर यांचा विजय असो यासह विविध घोषणा समाज बांधवांनी दिल्या.
एकजुटीने लढण्याचा निर्धार
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि समाज बांधवांनी मुंबई येथे जाऊन संस्थेचे विश्वस्त मंडळ व सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेतली. यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे संस्थेचा ताबा मिळवण्याच्या झालेल्या प्रयत्नांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. संस्थेच्या संरक्षणासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती बैठकीत देण्यात आली. यामध्ये न्यायालयीन लढाई, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, तसेच विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर करण्याच्या माध्यमातून संस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे पदाधिका-यांनी सांगितले.डॉ. शिरोडकर हायस्कूल येथे झालेल्या या बैठकीत संस्थेचे अस्तित्व टिकवणे, समाज बांधवांना संघटित करणे, सभासद नोंदणी सुरू करणे आणि तातडीने विशेष सर्वसाधारण महिन्याभरात सभा घेणे, यासंदर्भात सकारात्मक चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. संपुर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक राज्यातील ज्ञाती बांधवांना संघटीत करुन या संकटाविरोधात लढण्याचा निर्धार एकमुखी करण्यात आला.

संस्थेवरील संकट एकजुटीने दुर करुयात- अंकुश डगरे
आपल्या संस्थेत स्वप्निल फाटक यांनी बेकायदेशीर घुरखोरी करुन ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, या घटनेचा आम्ही निषेध करतो त्याला साथ देणारे आ. प्रसाद लाड यांच्या नावाचा अध्यक्ष म्हणुन या संस्थेत बोर्ड लावला. त्यांच्या समवेत असलेल्या चौघांचा सर्वांचा निषेध करतो. या पुढील काळात संस्था वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरील लढाई आम्ही लढणार आहोत, अशी प्रतिक्रिया क्षा.म.समाज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अंकुश डगरे यांनी दिली.

क्षा.म.समाजात तीव्र भावना- चंद्रकांत डिचोलकर
समाज संस्थेच्या परळ येथील इमारतीचा ताबा स्वप्निल फाटक यांनी केला. या विरोधात समाजात तीव्र भावना आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग, गोवासह अन्य भागातुन प्रमुख कार्यकर्ते आले होते. त्यामुळे स्वप्निल फाटक यांचा आम्ही निषेध करतो. संस्था वाचविण्यासाठी कुठेही दिरंगाई होणार नाही. तुमचे पाठबळ व आमची न्यायालयीन लढाई ही सुरु राहील. संपुर्ण ज्ञाती बांधवानी या लढयात सहभाग घ्यावा, असे आवाहन क्षा.म.समाज चंद्रकांत डिचोलकर यांनी केले.

एकजुटीने लढा उभारणार- रामदास विखाळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजातील प्रमुख बांधवांना घेवुन परळ येथे मुंबई संस्थेची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झालेली आहे. आगामी काळात एकजुटीने लढा उभारण्याचे ठरले आहे. स्वप्निल फाटक व प्रसाद लाड यांचा आम्ही निषेध करत आहोत, अशी प्रतिक्रिया क्षा.म.समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रामदास विखाळे यांनी दिली.

अन्यथा , समाज बांधव रस्त्यावर उतरणार- भगवान लोके
क्षा.म.समाज संस्था ताब्यात घेण्याच्यादृष्टीने स्वप्निल फाटक यांच्यामार्फत आ. प्रसाद लाड यांनी 9 आॅक्टोबरला प्रयत्न केला, त्यामुळे समाजात तीव्र भावना निर्माण झाला आहे. समाज म्हणुन या पुढील काळात संस्था वाचविण्यासाठी रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. हजारोंच्या संख्येने समाज बांधव या विरोधात संघटीत होत आहेत. त्यामुळे संस्थेवर ताबा मिळवणा-यांना हा गर्भित इशारा समजुन समाज भावना जाणुन घ्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा जिल्हा सरचिटणीस भगवान लोके यांनी दिला आहे.

शेअर करा