कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ समुहनृत्य स्पर्धा संपन्न
वेंगुर्ला,दि.०१ नोव्हेंबर(प्रथमेश गुरव)
नगर वाचनालय, वेंगुर्ला या संस्थेतर्फे वेंगुर्ला शहर मर्यादित अंगणवाडी आणि बालवाडीतील मुलांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या कै.केशवराव अंकुश कुबल रंगमंचावर कै.सौ.शुभदा अविनाश शेणई स्मृतिप्रित्यर्थ समुहनृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात श्री शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीने प्रथम, शेणई बालवाडीने द्वितीय आणि सरस्वती शिशुवाटिकेने तृतीय क्रमांक पटाकविला. या स्पर्धेचे बक्षिस वितरण जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे.
दरम्यान, या सांस्कृतिक कार्यक्रमात समुहनृत्य सादर करताना प्रत्येक बालवाडी तसेच अंणगवाडीने उपलब्ध साधनसामुग्रीचा सुयोग्य वापर केल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी विशेष पारितोषिके जाहीर केली आहेत. यात श्री शिवाजी प्रागतिकच्या अंगणवाडी ताईस ५०० तर विद्यार्थ्यांना ५००, शेणई बालवाडीच्या विद्यार्थ्यांना ५०० तर बालवाडी ताईस ५००, सरस्वती शिशुवाटीकेच्या विद्यार्थ्यांना ३०० तर बालवाडी ताईस ३०० आणि वेंगुर्ला शाळा नं.४च्या अंगणवाडी विद्यार्थ्यांना ३०० तर अंगणवाडी ताईस ३०० रूपये आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य दिपराज बिजीतकर, श्रीनिवास सौदागर, मयुरेश सौदागर, निशिगंधा पवार यांच्यासह अंगणवाडी ताई, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. समुहनृत्याचे परिक्षण माया परब, कैवल्य पवार, महेश बोवलेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी केले.