राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;एकूण ५५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ,दि.०१ नोव्हेंबर
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ-झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये गोवा बनावटीचे देशी मद्य ८६४० ब. ली (१००० पेटी) ३८ लाख ४० हजार रु. तर अशोक लेलेंड कंपनीचे सहाचाकी वाहन किंमत १७ लाख रु. आणि इतर मुद्देमाल १० हजार रु. असा एकूण ५५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.