देवगड : गणेशोत्सवानिमित्त अतुल राव राणे यांच्याकडून गणपती बाप्पाचे दर्शन

शेअर करा

उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या निवासस्थानी भेट; शाल-श्रीफळ देऊन केला सन्मान

देवगड,दि.२३ सप्टेंबर

कोकणात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळीही मागे नसून गणेश भक्तांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले जात आहे.

भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राव राणे यांनी देवगड तालुक्यातील विविध गणेश भक्तांच्या निवासस्थानी भेट देत श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी देवगड येथील उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी उद्योजक नंदकुमार घाटे यांनी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल राव राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे भक्तिमय वातावरणात आपुलकीचा संवादही साधला गेला

शेअर करा