देवगड विकास आराखड्यावरील १२०० हरकतींसाठी नागरिकांनी सुनावणीत सहभागी व्हावे; समन्वय समितीचे आवाहन

शेअर करा

लेखी स्वरूपात मते मांडल्याशिवाय हरकती शासनाच्या पटलावर जाणार नाहीत; जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन

देवगड ,दि.०७ ऑगस्ट

देवगड नगरपंचायत मधील विकास आराखड्या मधील सुमारे १२०० हरकती असूनही सुनावणीला प्रत्यक्षात पुढे येऊन आपल्या लेखी स्वरूपात संवाद साधला जात नाही तोपर्यंत या हरकती शासनाच्या पटलावर येणार नाहीत. त्यासाठी जागृतपणे नागरिकांनी पुढे यावे. असे आवाहन देवगड जामसंडे शहर विकास समन्वय समिती तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले.


या समन्वय समितीमार्फत सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे पदाधिकारी अण्णा खवळे शामल जोशी सुधीर मांजरेकर रिना आचरेकर शरद लाड यांनी विकास आराखडा व स्मार्ट मीटर याबाबत देवगड जामसंडे नगरपंचायत मधील नागरिकांनी याला कडाडून विरोध न केल्यास आपल्याला पुढील काळात असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागेल. असे स्पष्ठ करताना नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला १२०० ते १२५० प्रत्यक्षात हरकती प्राप्त झाल्या आहेत त्याची सुनावणी ११ ते १४ ऑगस्ट २०२६ दरम्यान होणार आहे. मात्र याबाबत समन्वय समिती मार्फत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. त्या त्या टप्प्यावर आवाहन करूनही केवळ ३०० हरकत दारानी संपर्क साधला आहे हरकत दारानी लेखी त्याबाबत आपली बाजू मांडण्याची गरज आहे. यामध्ये सुमारे ९० टक्के लोक गरीब आहेत. काहीना कायदेशीर सल्लागार नेमून आपली बाजू मांडली पाहिजे. अन्यथा विकास कामाच्या खाली आपण नष्ट होणार नाहीना . याकडे जागृत पने पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.


स्मार्ट मीटर बाबत यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटने मार्फत ॲड नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटर बाबत जिल्हा व राज्य संघटने मार्फत जोरदार विरोध केला जात आहे. जिल्ह्यात ४ लाख ५ हजार विद्युत ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ४ हजार २० ग्राहकांची संमती न घेताच मीटर बसविण्यात आलेत. २ लाख ६० हजार मीटर बंद आहेत. याबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटने मार्फत लेखी विरोध केला असून जिल्ह्यातील आठहि तालुक्यात त्याला विरोध अपेक्षीत आहे आपल्या तक्रारी महावितरण च्या तालुका तसेच जिल्हा राज्य स्तरावर पोहचविण्यासाठी व्हाॅटसॅप मार्फत दाखल करा असे आवाहन करून दि १० ऑगस्ट २६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली असून यांबाबत अधिक माहितीसाठी सुधीर मांजरेकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

शेअर करा