देवगड : गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात देवगडमध्ये दहीहंडीचा जल्लोष

शेअर करा

उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते मांजरेकर नाक्यावरील लायन्स स्टार दहीहंडीचे पूजन

देवगड,दि.०५ सप्टेंबर


“गोविंदा रे गोपाळा, गोविंदा आला रे…” अशा गाण्यांच्या तालावर आणि उत्साहपूर्ण वातावरणात आज देवगड तालुक्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध मंडळांच्या वतीने मानाच्या दहीहंड्या बांधण्यात आल्या असून, त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळाली.

मांजरेकर नाका येथे लायन्स स्टारच्या वतीने उभारण्यात आलेल्या दहीहंडीचे पूजन उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी अप्पा मांजरेकर, अनिल खडपकर, रोहित डोके, प्रसाद मांजरेकर, तुषार पेडणेकर, वीरेंद्र कांबळे, गौरव पारकर, केदार मांजरेकर,नगरसेवक विशाल मांजरेकर,शरद शिंदे प्रणील खडपकर तसेच लायन्स स्टारचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, देवगड तालुक्यातील विविध भागांमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रेंड सर्कल, इंद्रधनू, देवगड-जामसंडे व्यापारी संघटना, कॉलेज रोड, पडेल कॅन्टीन आदी ठिकाणी आकर्षक दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत.

दहीहंडी पाहण्यासाठी तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, गोविंदा पथकांच्या थरारक सादरीकरणामुळे उत्साहाला उधाण आले आहे. “गोविंदा रे गोपाळा”च्या जयघोषात दहीहंडी फोडताना परिसर जल्लोषाने दुमदुमून जात आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या या उत्सवामुळे देवगडमध्ये भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले

शेअर करा