देवगड ,दि. १० जून
देवगड दाभोळे मार्गावरून कुणकेश्वर ,आचरा, मालवण या ठीकाणी ये जा करणा-या वहान धारकांची संख्या मोठी आहे. याच मार्गावरील दाभोळे पुलानजीकच्या उतारावरच गेले अनेक महिने भला मोठा खड्डा पडलेला आहे. मात्र या खडयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या खडयाचा विस्तार वाढतच गेला.
पावसाच्या पहिल्या सरीत हा खड्डा अधिकचा धोकादायक बनला. या खडयामुळे छोटया मोठया वहान चालकांना या मार्गावरून वहान चालवताना कोणताही अपघात होवू नये या एका उध्दात भावनेने दाभोळे पाडथर येथील मोलमजूरी करणा-या अनिल अंकूश गोरवले, अनिरूध्द मनोहर सावंत,अन्वी अनिरूध्द सावंत व राजेश्री राजेश धुरी आदीनी स्वखर्चाने खडी, वाळू, आणि सिमेंटचा वापर करून खडयाची बुजवणी केली.यामुळे या कष्टकरी लोकांचे या मार्गावरून सतत ये जा करणारे प्रवाशी आनंद देवगडकर व इतर वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून कौतूक केले.