देवगड : २२ कोटींचा विमा हप्ता भरूनही बागायतदारांना मिळाले फक्त २.७५ कोटी!

शेअर करा

७,२०० पैकी ६ हजार बागायतदारांची केवायसी पूर्ण; तरीही बहुतांश आंबा-काजू बागायतदार नुकसानभरपाईपासून वंचित

देवगड,दि.१७ सप्टेंबर

शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत अद्यापही बहुतांश नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही.ही मदत गणेशचतुर्थीपुर्वी बागायतदारांना मिळणे गरजेचे होते.7200 बागायतदारांपैकी सुमारे 6 हजार बागायतदारांनी आपली केवायसी पुर्ण केली आहे तरीही हे बागायतदार नुकसानभरपाईपासुन वंचित आहेत.ेथील बागायतदारांनी सुमारे 22 कोटी रूपये विमा कंपन्यांकडे भरणा केले आहेत मात्र नुकसानभरपाईपोटी विमा कंपन्यांकडून 2 कोटी 75 लाख रूपये बागायतदारांना परतावा देण्यात आला आहे.

प्रधानमंत्री फसल योजना ही कार्पोरेट योजना ठरली असून नादान लोकप्रतिनिधी व बेजबाबदार सरकारमुळे येथिल शेतकèयांचे हे हाल झाले आहेत त्यामुळे येथिल शेतकèयांना योग् न्याय ळिेपर्यंत आम्ही आमचा शासनाविरूध्दचा लढा काय सुरू ठेवणार आहोत असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टीांनी देवगड येथील शासकी विश्रामगृह येथे गुरूवारी आयोजित पत्रकारपरिषदेत दिला.ावेळी आंबा काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा कणकणवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, उबाठा युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, सुजित चौकेकर आदी उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, फेब्रुवारी महिन्यापासून येथिल आंबा व काजू बागायतदार आपल्या न्याय् मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शासनाकडे न्यायाची अपेक्षा करीत आहेत.ासाठी शेतकèयांनी आंदोलने देखिल केली.या कठीण काळात शेतकèयांना सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची होती.त्यांच्या आंदोलनाची दखल घेणे गरजेचे होते.शेतकèयांना नुकसानभरपाईपोटी हेक्टरी 22 हजार 500 रूपये एवढी तुटपुंजी मदत शासनाने जाहीर केली.ही मदत गणेशचतुर्थीपुर्वी बागायतदारांना मिळणे गरजेचे होते.परंतू अद्यापही बहुतांशी बागायतदार या तुटपुंज्या नुकसानभरपाईपासूनही वंचित आहेत.2019 मध्ये सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या महापूरात शेतकèयांचे मोठे नुकसान झाले होते.त्यावेळी शासनाने नुकसानभरपाईच्या निकषात बदल करून सरसकट कर्जमाफी शेतकèयांना दिली होती हा पॅटर्न कोकणातील शेतकèयांसाठी का लागू करण्यात आला नाही? येथिल शेतकèयांची कर्जाची थकबाकी खुप कमी प्रमाणात आहे.शासकी पंचनाम्यानंतर विशेष बाब म्हणून शेतकèयांना सरसकट कर्जमाफी मिळणे गरजेचे होते.देवगड तालुक्यात चार हवामान केंद्र असून केवळ एका मंडलातील शेतकèयांना विमोजनेचा लाभ मिळाला आहे उर्वरीत तीन मंडलातील शेतकरी अद्यापही विमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.येथिल शेतकèयांनी विमा कंपन्यांकडे 22 कोटी रूपये जमा केले आहेत.परंतू विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईच्या परताव्यापोटी शेतकèयांना 2 कोटी 75 लाख रूपये अदा केले आहेत.हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींचा फटका सर्वसामान् शेतकèयांना बसला असून याचा फायदा विमा कंपन्यांनी घेत शेतकèयांची घोर फसवणुक केली आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

भांडवली उद्योगांमुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडत आहे.एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे.हे करताना सरकारने शेतकèयांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.भांडवली उद्योगांमुळे किती प्रमाणात रोजगार निर्माण झालााची श्वेतपत्रिका शासनाने काढावी.कोट्यावधी रूपयांचे प्रकल्प जाहीर करून त्याचा डीपीआर वाढवायचा व मोठे कमिशन घ्यायचे हे काम सत्ताधाèयांचे सध्या सुरू आहे.सरकारने कृषी र्पटनाला चालना द्यावी, पारंपारिक उद्योगांना चालना द्यावी परंतू अणुउर्जासारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणू नयेत.त्याला आमचा कायम विरोधच राहील.ा प्रस्तावित प्रकल्पाचा एमओयू रद्द झाल्याचे शासनाने जाहीर करावे.आम्ही मुख्मंत्री, पालकमंत्र्यांचे अभिनंदन करू असा टोला शेट्टी यांनी लगावला.

आमचा कोणताही कार्यकर्ता जातीवादी नाही.तरीही आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या व नाहक गुन्ह्यात अडकविण्याचे काम सत्ताधाèयांचे सुरू आहे.देवगडेथील गणेश गावकर यांच्यावर खोटा अ‍ॅट—ासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तर वेंगुर्ल्यांतील एका र्काकर्त्याला ड—ग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले.त्या कार्यकर्त्यांचा घरात ड—ग्जची पाकीटे पोलिसांनीच ठेवली असावीत असा आमचा संशय आहे.ा गुन्ह्यातील ड—ग्ज पॅडल पोलिसांनी का शोधला नाही.निर्दोष माणसांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी जोडधंदा तर सुरू केला नाही ना! ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येईल त्यांचा पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट करीत सिंधुदूर्गचा बिहार झाला की का असा सवाल उपस्थित केला.भविष्यात विरोधात असलेले सत्तेत येतील तेव्हा कंबरेला चिंधीही शिल्लक राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.ावेळी शेतकèयांच्या आंदोलनातील लढवय्या र्काकर्ता म्हणून गणेश गावकर यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

शेअर करा