देवगड ते अक्कलकोट रिक्षातून भक्तिमय प्रवासाला प्रारंभ

शेअर करा

श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी १३ रिक्षाचालकांचा अनोखा संकल्प; देवगड येथून चार रिक्षांमधून यात्रेला उत्साहात सुरुवात

देवगड,दि.०७ ऑगस्ट

देवगड शहरातील रिक्षाचालक दरवर्षी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र यंदा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी रिक्षातून देवगड ते अक्कलकोट असा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे. या अनोख्या भक्तिमय प्रवासाला शुक्रवारी दुपारी ३ वाजता देवगड येथून प्रारंभ झाला.

या उपक्रमाचा शुभारंभ देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे स्वच्छता व आरोग्य सभापती निवृत्ती उर्फ बुवा तारी तसेच देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. उपस्थितांनी रिक्षाचालकांना या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

या यात्रेत रिक्षाचालक पिंटू जाधव, केतन कुडवे, बाबू कदम, छोटे मुणगेकर, प्रकाश मुणगेकर, सचिन गिरकर, सचिन घाडी, पप्पू तारी, अंकुश हट्टणकर, दशरथ पेंडणेकर, संजय करंगुटकर, दामोदर खवणेकर व माया मुणगेकर असे एकूण १३ रिक्षाचालक चार रिक्षांमधून सहभागी झाले आहेत.

देवगड ते अक्कलकोट असा प्रवास पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात अक्कलकोट, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी दर्शन तसेच कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर या धार्मिक स्थळांना भेट देण्यात येणार असल्याची माहिती रिक्षाचालक केतन कुडवे यांनी दिली.

शेअर करा