देवगड ,दि.२२ जुलै
साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १९ व्या जागतिक तायक्वान्डो कल्चर एक्स्पो २०२६ स्पर्धेत देवगडच्या धन्वी नितीन वळंजू हीने भारताचे प्रतिनिधित्व करत क्योरुगी व पुमसे या दोन प्रकारा मध्यें दोन सिल्वर मेडलची कमाई केली. धन्वी मुंबई सेंट्रल येथील सेंट जोसेफ हायस्कूल मध्ये सहावीत शिकत असून तिने अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गेल्यावर्षी गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदक मिळविले तसेच जून 2026 मध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरिय स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. तिच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे दक्षिण कोरियातील स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली. तिला प्रशिक्षक रोहिदास शिर्के, नवीन दवे आणि ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.