संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड व ओटीपीसाठी मोबाईलसह उपस्थित राहण्याचे तहसीलदार शीतल जाधव यांचे आवाहन
देवगड,दि.०३ ऑगस्ट
देवगड तहसिल कार्यालयामध्ये दि. 5 ऑगस्ट 2026 रोजी डिजीटल हयात दाखले नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य नोंदणी अंतर्गत संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी डिजीटल हयात दाखले नोंदणी करणे आवश्यक असून देवगड तालुक्यात देवगड आणि जामसंडे गावांमध्ये मिळून 180 लाभार्थी संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत आहे.हयात दाखले(डिएल्सी) एकाच छताखाली डिजीटल नोंदणी करण्याचा उद्देशाने डिजीटल हयात नोंदणी हे विशेष शिबीर 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित करण्यात आले असून या शिबीरात देवगड व जामसंडे मधील लाभार्थ्यांनी सहभागी होवून आपले हयात दाखले नोंदणी करून घ्यावेत असे आवाहन देवगड तहसिलदार शीतल जाधव यांनी केले आहे.लाभार्थ्यांनी सोबत आपले आधार कार्ड व ओटीपीसाठी मोबाईल आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.