​Sawantwadi News : सावंतवाडीत ‘लेक्स डिस्कशन’ व्याख्यानमालेचे आयोजन

शेअर करा

‘जामिनाचा कायदा’ या विषयावर होणार मार्गदर्शन

​सावंतवाडी,दि. ३१ ऑक्टोबर
सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे ‘Lex Discussion’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत गोवा राज्याचे पालक न्यायमूर्ति अश्विन दामोदर भोबे यांचे “जामिनाचा कायदा” (Law Of Bail) या महत्त्वाच्या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
उद्या ​रविवार, ०१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता दिवाणी न्यायालय, सावंतवाडी येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.
​या व्याख्यानास सावंतवाडी परिसामधील सर्व वकील मंडळी तसेच सर्व विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबुराव रणशूर व सचिव ॲड. संकेत अभय नेवगी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

शेअर करा