सायबर गुन्हेगारांवर कारवाईची मागणी; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचेही पोलीस अधीक्षकांना पत्र!
सावंतवाडी दि.३१ ऑक्टोबर
सावंतवाडी शहरामध्ये MNGL या कंपनीचे सांगून नाव ऑनलाईन फसवणूक होत आहे. तसेच फ्रॉड कॉल करत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना गंडा जात आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर व शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. या गुन्हाची गांभीर्याने दखल घेत सायबर कॉईमकडून सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. तर नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पोलीस अधीक्षकांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी शहरामध्ये या एक दोन दिवसात MNGL कंपनीचे नाव सांगून मोबाईलद्वारे संपर्क करीत नागरीकांना बिलाची किंवा कनेक्शेन जोडणी करीता ओटीपी मागून त्याच्या खात्यातील पैसे चोरून फार मोठी फसवणूक होत आहे. सर्व सामान्य तथा जेष्ठ नागरीक यांना ऑनलाईन व्यवहाराबाबत जागृती नसल्याने अशा पध्दतीचे गुन्हाची गांभीर्याने दखल घेण्यात यावी व सायबर कॉईम मार्फत सखोल तपास करून संबधित गुन्हगारांना पकडुन शिक्षा होण्याकरिता त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी केली आहे. तसेच सावंतवाडी शहरामध्ये आयुर्वेदिक तथा ऑलोफेथिक औषधाबाबत अधिकीरी असल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करीत असल्याबाबतही त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
सावंतवाडी शहरामध्ये परिसरात काही इसम हे आयुर्वेर्दिक तथा ऑलोफेथिक औषधांबाबत अधिकारी असल्याचे भासवुन लोकांच्या घरी जात त्यांना नागरिकांना आजार असल्याचे सांगून वेगवेगळे औषधांचे संशयास्पद पध्दतीने वेगवेगळ्या संस्थाशी संबंध असल्याचे सांगून दिशाभुल करित आहे. अशा पद्धतीत घरोघरी फिरत रेखी करून भविष्यात संघठीत गुन्हगारी घडणे नाकारता येणार नाही. त्यामुळे आवश्यक तो तपास करून अशा इसमांना शोधून काढणे व चौकशी होणे आवश्यक आहे असं भाजप नगरसेवकांनी म्हटलं आहे. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, नगरसेवक प्रतिक बांदेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेवक नीलम नाईक, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेवक सुकन्या टोपले, नगरसेवक दुलारी रांगणेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी पोलीस अधीक्षकांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी शहरातील नागरिकांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या नावाने बनावट कॉल आणि मेसेज करून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. सायबर भामटे नागरिकांना गॅस बिल भरण्यासाठी, अपडेट करण्यासाठी किंवा बिल न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन ओटीपी, कस्टमर आयडी व खाजगी माहिती मागत आहेत. या सायबर गुन्ह्यांच्या अनुषंगाने काल रात्री तक्रार अधिकृतपणे नोंदवण्यात आल्या आहेत. बऱ्याच ग्राहकांची फसवणूक झाली असून शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषयात पोलीस प्रशासनाकडून तातडीने सायबर सेलतर्फे सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सौ. भोसले यांनी केली आहे.