देवगड : नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शैक्षणिक साहित्य वाटप

शेअर करा

देवगड,दि. २२ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २३ जून रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्या सौजन्याने आयोजित या समाजोपयोगी उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात येणार असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यावेळी भाजप व भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत.

शेअर करा