देवगड ,दि.०५ जुलै
तालुक्यातील तांबळडेग खाडीत पागाने मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका मच्छीमाराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे घडली. जतीन चंद्रकांत कोचरेकर (वय ४५, रा. तांबळडेग, मधलीवाडी) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जतीन कोचरेकर हे रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तांबळडेग–मोर्वे खाडीत पागाने मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासेमारी करत असताना त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
त्यांचा मृतदेह रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास तांबळडेग–मोर्वे खाडीच्या संगमाजवळ आढळून आला.
याप्रकरणी सुरेशदेव विश्वनाथ सारंग (रा. तांबळडेग, मधलीवाडी) यांनी देवगड पोलीस ठाण्यात खबर दिली असून, अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणपती गावडे करीत आहेत.