देवगड : श्री खवळे महागणपतीचे पालकमंत्री नितेश राणेंनी घेतले दर्शन

शेअर करा

खवळे कुटुंबीयांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार


देवगड,दि.२० सप्टेंबर

देवगड तालुक्यातील प्रसिद्ध श्री खवळे महागणपती मंदिराला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत श्री महागणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.


पालकमंत्री नितेश राणे यांच्यासमवेत माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, युवा शहराध्यक्ष दयानंद पाटील, ज्ञानेश्वर खवळे, माजी नगरसेवक बापू जुवाटकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी खवळे कुटुंबीयांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री खवळे महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांचे खवळे कुटुंबीयांनी स्वागत केले

शेअर करा