देवगड तालुक्यातील शिरगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट

शेअर करा

देवगड,दि.२१ सप्टेंबर

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देत श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सरचिटणीस संदीप साटम, अमित साटम, मिलिंद साटम, संतोष किंजवडेकर, संतोष तावडे, राजा साटम, नंदू देसाई, सुधीर साटम, राजा भस्मे, मंगेश लोके, विवेक जामसंडेकर आदी उपस्थित होते.

शेअर करा