उच्च रक्तदाब, मधुमेह, ईसीजी व हिमोग्लोबिन तपासणीसह ३६८ नागरिकांची आरोग्य तपासणी; ६ जणांना आयुष्मान भारत कार्ड
देवगड,दि.१२ ऑगस्ट
किंजवडे येथे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत किंजवडे व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरामध्ये ग्रामस्थांची उच्च रक्तदाब (HTN), मधुमेह (DM), ईसीजी आणि हिमोग्लोबिन यांसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी उच्च रक्तदाबाची ९०, मधुमेहाची ९०, ईसीजीची ९० तर हिमोग्लोबिनची ४२ तपासण्या करण्यात आल्या. तसेच ६ नागरिकांचे आयुष्मान भारत (PMJAY) कार्ड काढण्यात आले.
आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व आरोग्यसेवकांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून ग्रामस्थांची तपासणी केली. विविध आरोग्यविषयक तपासण्यांसोबतच नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायत किंजवडे आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. शिबिराला उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतलेल्या सर्व ग्रामस्थांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
‘आपले आरोग्य… आमची जबाबदारी’ आणि ‘निरोगी गाव – समृद्ध गाव’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण झाली.