देवगड स्टँड परिसरातील प्रस्तावित सर्कलच्या कामाची पाहणी

शेअर करा

पर्यटनाला चालना; वाहतूक कोंडीवरही मिळणार दिलासा

देवगड,दि.२१ ऑगस्ट

देवगड बसस्थानक परिसरात प्रस्तावित सर्कलच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित विभागाला दिल्या

देवगड हे पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने विकसित होत असलेले शहर असून, स्टँड परिसरात उभारण्यात येणाऱ्या सर्कलमुळे परिसराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडणार आहे. याशिवाय अनेक वर्षांपासून जाणवत असलेली वाहतुकीची समस्या कमी होऊन वाहनचालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम , भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील भाजपा शहराध्यक्ष वैभव करगुटकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर,नगरसेवक निवृत्ती तारी,भाजपा गटनेते शरद ठुकरूल, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, नगरसेवक संतोष तारी , नगरसेविका तन्वी चांदोस्कर,माजी नगराध्यक्ष प्रियंका साळस्कर,देवगड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शैलेश कदम आनंद रामाने तसेच भाजपा पदाधिकारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा