देवगड,दि. २२ जून
या वर्षी “Yoga for healthy Ageing निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेने प्रेरित होऊन, भारतातील सर्व नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करून निरोगी आणि सुदृढ आयुष्याची वाटचाल करावी. योग हे केवळ शरीरच नव्हे तर मन आणि आत्म्याचेही स्वास्थ्य टिकवण्याचं प्रभावी साधन आहे. म्हणूनच महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संपूर्ण देशात योग साधने बाबत जनजागृती सोबतच समाजाला सदृढ ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक हा अहोरात्र झटत आहे, सलाबादप्रमाणे महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सरांच्या आदेशवरून रविवार दिनांक २१ जून २०२६ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून रोजी १२ वे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात मुलुंड येथील स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे व अस्लफा घाटकोपर स्थानिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे उपस्थित होते…..
योगशिक्षक दिलीप घाडगे, रुपाली शिंदे, संतोष खरटमोल, अनिल शिंदे, लक्ष्मीबेन गजरा, राजश्री मोरे, रेखा भिंगार्डे , सोनाली चव्हाण, सोनल पिंगळे, राखी सोनवणे, मेघा वालावलकर, ईश्वरी शिंदे, सविता कदम, बाळू शिंदे, भानुदास मगदूम, संजीवनी शेटे या टीमने मराठा मंडळ मुलुंड, देशमुख गार्डन, नवघर सभागृह मुलुंड पूर्व व पश्चिम येथे. तसेच रिद्धी देवघरकर आणि अमित चिबडे यांनी अमित रिद्धी योगशाला मार्फत एवरशाईन नगर, मालाड पूर्व. मनुजा चव्हाण, हिरा गणवीर, केशर कुलाबकर, शालिनी भंडारी, भारती कावनकर, रेश्मा पाटील कांदिवली चारकोप, कृष्णाकुमार शिंदे सायन धारावी, सुमन नागरे ताडदेव युसूफ मेहअरली विद्यालय, साक्षी कलगुटकर, अर्निका बांदेलकर, प्रसाद काठे असल्फा येथील जोगर्स पार्क घाटकोपर, असे अनेक योगशिक्षकांडून संपूर्ण मुंबई मधून महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा टीमकडून हा योगदिवस आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला!
२१ जून २०२६, १२ वे आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त संपूर्ण मुंबईमधून विद्यार्थी असो तसेच त्यांचे पालकगण असो आणि योगसाधक व उपस्थित रहिवाश्यांना या उपक्रमात सामावून घेतल्याबद्दल सर्व योगविर व योगवीरांगणा यांचे मुंबई जिल्हाअध्यक्ष मनुजा चव्हाण व राज्य कोषाध्यक्ष संतोष खरटमोल यांनी मनापासून आभार व्यक्त केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!