देवगड : जामसंडेच्या हिमांशू चव्हाणचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

शेअर करा

पाचवी शिष्यवृत्तीच्या अंतिम गुणवत्ता यादीत तालुक्यात सहावा, जिल्ह्यात ५८वा क्रमांक

देवगड दि.०४ जुलै
नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती अंतिम गुणवत्ता यादीत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेच्या कुमार – हिमांशू नारायण चव्हाण याने इयत्ता पाचवी मध्ये शहरी सर्वसाधारण गटात तालुक्यात ०६ वा तर जिल्ह्यात ५८ वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच कुमार – सार्थक सतीशकुमार कर्ले
याने इयत्ता आठवी मध्ये शहरी सर्वसाधारण गटात तालुक्यात ०३ रा व जिल्ह्यात ४८ वा क्रमांक पटकावला आहे.
गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे, सचिव – प्रवीण जोग , शाला समिती अध्यक्ष – श्रेय.प्रसाद मोंडकर , मुख्याध्यापक श्री. सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा