१७ वर्षांखालील मुलींच्या संघाचा तालुक्यात प्रथम, तर मुलांच्या संघाला द्वितीय क्रमांक
देवगड,दि.२८ सप्टेंबर
शेठ म.ग.हायस्कूल देवगड येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रशालेच्या मुलांच्या संघाने देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना श्री.सतीशकुमार कर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अॅड.अजितराव गोगटे,सचिव- प्रवीण जोग , क्रीडा समिती अध्यक्ष- श्री.प्रशांत वारीक, मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.