६३ हून अधिक रक्तदात्यांचे स्वेच्छेने रक्तदान; विविध संस्था आणि वैद्यकीय पथकाचे सहकार्य
देवगड,दि.२५ ऑक्टोंबर
रक्तदान हेच श्रेष्ठ दान या सामाजिक भावनेतून आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने देवगड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तकेंद्र, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, फ्रेंड्स सर्कल देवगड-सडा, गुजराती नवरात्र मंडळ देवगड आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. या उपक्रमाला देवगड परिसरातील नागरिक आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ६३ हून अधिक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कांतीभाई पटेल, हरीभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, भावेश पटेल, वसंत पटेल, जिगर पटेल, प्रशांत पटेल, लहरीकांत पटेल, नितीन बांदेकर, सुंदर जगताप, राजेश तारी, किरण कुर्लेकर, शेखर सावंत, नितीन सावंत, प्रवीण सावंत, प्रवीण खडपकर, उद्धव गोरे, वैभव वारी, प्रसाद दुखंडे आणि पंढरीनाथ आचरेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील रक्तकेंद्राच्या वैद्यकीय पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्नती लाडकल, नर्सिंग ऑफिसर सुमंगल बुगाडे, समाजसेवा अधीक्षक सौरभ शिंदे, रक्त वैज्ञानिक अधिकारी पवन हराळे, रक्तपेढी तंत्रज्ञ जान्हवी तायशेट्ये, रक्तपेढी सहाय्यक कांचन परब, परिचर निलेश पाटील व प्रथमेश घाडी तसेच वाहनचालक गणेश मांजेरेकर यांचा समावेश होता.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या दृष्टीने या शिबिराचे महत्त्व अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदात्यांनी मोलाचे योगदान दिले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.