Devgad news : देवगडमध्ये २५ ऑक्टोबरला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

शेअर करा

देवगड-सडा येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे सकाळी ९ वाजता शिबिर; विविध संस्थांचा संयुक्त पुढाकार!

देवगड,दि.२४ ऑक्टोंबर
देवगड- तारामुंबरी रोड येथील राधाकृष्ण रिट्रीट येथे २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग आयोजित तसेच फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा, गुजराती नवरात्र मंडळ, देवगड व सिंधु रक्तमित्र- शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राजेश तारी (९४२०२६००८०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल देवगड सडा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

शेअर करा