Devgad news : देवगडमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासूर स्पर्धा २०२६!

शेअर करा

फ्रेंडस् सर्कल देवगड-सडा यांच्यावतीने आयोजन; खुला गट आणि मिनी नरकासूर अशा दोन गटांत रंगणार स्पर्धा!

देवगड,दि.२४ ऑक्टोंबर
फ्रेंडस् सर्कल देवगड सडा यांच्यावतीने ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता फ्रेंडस् सर्कल नाका- देवगड येथे भव्य नरकासूर स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुला गट व मिनी नरकासूर अशा दोन गटात घेण्यात येणार आहे.
या स्पर्धेत खुल्या गटातील प्रथम क्रमांकास रोख १२ हजार रूपये, द्वितीय क्रमांकास रोख ८ हजार रूपये, तृतीय क्रमांकास रोख ४ हजार रूपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. तर मिनी नरकासूर गटातील प्रथम क्रमांकास रोख १,५०० रूपये, द्वितीय क्रमांकास रोख एक हजार रूपये, तृतीय क्रमांकास रोख ५०० रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. बेस्ट एन्ट्रीसाठी रोख १ हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. खुल्या गटातील नरकासूराची उंची कमाल १२ फूट, तर मिनी नरकासूराची उंची ३ फूटापर्यंत मर्यादित असावी. खुल्या गटातील चलचित्र नरकासूराची उंची स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वाढविता येईल. नरकासूर स्पर्धेच्या ठिकाणी रात्री १० वाजेपर्यंत आणणे बंधनकारक आहे. रात्री १० वाजल्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी आल्यास १० गुण कमी करण्यात येतील. प – त्येक स्पर्धकाला / मंडळाला सादरीकरणासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात येईल. स्पर्धेच्या ठिकाणी नरकासूर दहन करता येणार नाही. स्पर्धकांनी नाव नोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करायची आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी आदेश बांदेकर (७२६२०११७०८) व चरण काटोकर यांच्याशी संपर्क साधावा. कोकणच्या सांस्कृतिक परंपरेच्या या भव्य उत्सवात स्पर्धक, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन फ्रेंडस् सर्कल मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

शेअर करा