दिक्षित फाउंडेशनच्या देणगीतून साकारलेले प्रशिक्षण केंद्र; निरंजन दीक्षित यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
देवगड,दि.२५ जून
देवगड तालुक्यातील शेठ म.ग हायस्कूल मध्ये दिक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या निळकंठ श्रीधर दीक्षित संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन निरंजन दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी स्थान समिती सचिव एडवोकेट अविनाश माणगावकर सदानंद पवार राजेंद्र हिंदळेकर पुष्कर आपटे विलास रूमडे दयानंद पाटील आदी उपस्थित होते