देवगड-जामसंडे शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश; जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले तातडीचे आदेश
देवगड,दि.१० ऑगस्ट
देवगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना थकित बिलांमुळे जेवण व नाष्टा मिळत नसल्याच्या गंभीर समस्येची दखल घेत देवगड-जामसंडे शहर समन्वय समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. समितीने यापूर्वी ६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन जनरेटर बंद असल्याबाबत कळविले होते .त्याबाबत माहिती घेणेसाठी आज समिती ओरोस येथे गेली असता तातडीने जनरेटर दुरुस्त करणेचे आदेश संबधित अधिकारी वर्गांना दिले आहेत .सोमवारी १० ऑगस्ट रोजी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सकांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रश्नाबाबत चर्चा केली.तसेच
देवगड ग्रामीण रुग्णालयात डोळ्यांच्या उपचारासाठी तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी मोठ्या संख्येने गरीब व वृद्ध रुग्ण येतात. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठी अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रुग्णांना तसेच त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात स्वतःच्या खर्चाने जाणे अनेकदा शक्य होत नाही.
वाहनांची उपलब्धता, रुग्णांचे वयोमान आणि आर्थिक अडचणी यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर डोळ्यांची काळजी घेण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. शस्त्रक्रिया झालेनंतर रुग्नाना ओरोस येथून देवगडला परतीसाठी गाड्या मिळणे अवघड होते .त्या अनुषंगाने समितीने जिल्हा प्रशासनास निवेदन दिले कि परतीच्या प्रवासासाठी आपल्या माध्यमाद्बारे गाडीची सोय करणेत यावी
या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ओरोस येथे जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेत या विषयाची चौकशीगू केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी समितीच्या मागणीची तातडीने दखल घेतली
यानंतर समितीच्या त्सांपासून निर्माण झालेला रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत तसेच उपचाराच्या काळात त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने अशा प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या पाठपुराव्यात सौ. शामल जोशी, सौ. अश्विनी मोहिते, आप्पा मांजरेकर, प्रशांत खवणेकर, शरद लाड, तुषार पवार, शिवराम निकम, बाबा आचरेकर, शैलेश महाडिक, सूर्यकांत लाड आदी उपस्थित होते.