देवगड पोलिसांची कारवाई; गोवा बनावटीची दारू व ॲक्टिव्हा स्कुटी जप्त

शेअर करा

मिठबांवरी बागवाडी येथे १८ हजारांची गोवा बनावटीची दारू व ७० हजारांची दुचाकी असा ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; संशयितावर गुन्हा दाखल

देवगड,दि.०७ ऑगस्ट

मिठबांवरी बागवाडी येथील देवगड-कुणकेश्वर मार्गावर ॲक्टिव्हा स्कुटीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीवर देवगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १८ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी अविनाश जयवंत मोहिते (वय ५७, रा. देवगड किल्ला) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. बागवाडी येथील देवगड-कुणकेश्वर मार्गावर ॲक्टिव्हा स्कुटीवरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

या कारवाईत १८ हजार रुपये किमतीची दारू तसेच ७० हजार रुपये किमतीची ॲक्टिव्हा स्कुटी असा एकूण ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई महेंद्र महाडिक , पोलीस कॉन्स्टेबल रवी महाले आणि पोलीस कॉन्स्टेबल डोईफोडे यांनी केली. प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

शेअर करा