आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ; ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमला
देवगड,दि. १८ ऑगस्ट
हेलियम डे निमित्त विजयदुर्ग एसटी डेपो येथे आयोजित रॅलीचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला. ढोल-ताशांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात रॅलीला सुरुवात झाली.

या रॅलीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर सुनील आठवले, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पंचायत समिती सदस्य सुप्रिया आळवे, प्रदीप साखरकर, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे,राजेंद्र परुळेकर, दिनेश गावकर, माजी पंचायत समिती सदस्य शुभा कदम, सरपंच लतिका गिरकर, राकेश पाटील, विनायक तोडणकर, कणकवली पंचायत समिती सदस्य बबलू सावंत, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोस्कर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
रॅलीदरम्यान घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने विजयदुर्ग परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


