देवगड : तारामुंबरी येथे दुर्मीळ नाणी नोटांचे प्रदर्शन

शेअर करा

देवगड,दि.२१ सप्टेंबर

तारामुंबरी येथील सुपूत्र विजय खवळे यांच्या अष्टांग नाणी व नोटांच्या संग्रहातून गोळा करण्यात आलेल्या दुर्मिळ नाणी आणि नोटा पहाण्याची संधी नाणक शास्त्राचा अभ्यास करणा-या अभ्यास प्रेमिंना देवगड मधील तारामुंबरी येथील प्रदर्शानातून उपलबध्द झाली आहे.
 देवगड तालुक्यातील प्रसिध्द खवळे गणपती नजीक शीवसदन निवास येथे १५ ऑगस्ट १९४७ पासून ते आज तागायत नाणी, नोटांच्या संग्रहाचे सर्वांसाठी खुले प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे.या प्रदर्शनात १९४७ नंतर आरबीआय व भारत सरकारने काढलेली UNC नाणी, नोटा,विदेशी २२० देशांची नाणी, नोटा, पोस्ट तिकिटे,विविध् आकारांची रंगीत नाणी, भारतातील विविध जुनी संस्थान व राज्यांची नाणी, भारत इंग्रजी काळातील टोकन, कॉइन्स, नोटा, जगातील सर्व जुन्यानव्या देशांची राजचिन्हे, झेंडे,नकाशे पोस्ट स्टँपस अशा दुर्मिळ संग्रहीत बाबी पहाण्याची सुवर्ण संधी अभ्यास प्रेमींना मिळणार. आहे.

नाणकशास्त्र व अर्थव्यस्थेचा अभ्यास करणा-या तसेच शालेय व महाविदयालयीन विदयार्थी वर्गाने या प्रदर्शानास आवर्जून भेट दयावी. अनंत चतुर्थी पर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले असून विनामुल्य आहे. तरी या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक विजय खवळे यांनी केले आहे

शेअर करा