देवगड,दि.१० सप्टेंबर
देवगड तालुक्यातील कातवण- कातवणेश्वर येथील सौ. शुभांगी रमेश लब्दे (७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. सदैव हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ देवगड या संस्थेचे सचिव व कुणकेश्वर शिक्षण विकास मंडळाचे सचिव संकेत रमेश लब्दे यांच्या त्या मातोश्री होत.