देवगड : पंचायत समिती देवगड येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा

शेअर करा

देवगड,दि.०६ जुन

 शिवस्वराज्य दिनानिमित्त पंचायत समिती देवगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचायत समिती परिसरात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी विधीवत उभारण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 यावेळी महाराष्ट्र गीत व राज्यगीत सादर करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये स्वराज्याच्या इतिहासाविषयी अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली.

 कार्यक्रमास अधिक्षक कुणाल मांजरेकर यांच्यासह पंचायत समितीतील खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक धुरी यांनी केले.

शेअर करा