शिवराज्याभिषेक दिनाचे स्मरण; इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २७ जून रोजी शिवभक्तांचा मेळावा
देवगड,दि.२६ जून
सकल हिंदू समाज, देवगड-जामसंडे यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटनेचे स्मरण करून हिंदवी स्वराज्याची गौरवशाली परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण, महाआरती तसेच राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि संस्कार जागृत करणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवचरित्रातील विचार आणि स्वराज्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून देवगड-जामसंडे परिसरातील शिवप्रेमी, युवक आणि नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.