Dodamarg News :साटेली-भेडशीत समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन; ३ नोव्हेंबरला भव्य मोफत आरोग्य शिबिर!

शेअर करा

गोव्यातील तज्ज्ञ वैद्यकीय पथक करणार तपासणी; भाविकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे विठोबा राऊळ यांचे आवाहन!

दोडामार्ग,दि.२९ ऑक्टोंबर

पिंगुळी येथील महायोगी प. पू. समर्थ राऊळ महाराज यांच्या साटेली भेडशी येथील स्मारक मंदिराचा दहावा वर्धापनदिन ३ नोव्हेंबर रोजी मोठया उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने या ठिकाणी प्रथमच भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. कोणत्याही प्रकारची सुर्ई न टोचता, निरोगी आरोग्यासाठी एक पाऊल पुढे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले आहे तेव्हा जास्तीत जास्त भाविक नागरीकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष विठोबा विनायक ( अण्णा) राऊळ यांनी केले आहे. गोवा येथील तंज्ञ वैद्यकीय पथक तपासणी करणार आहेत.

साटेली भेडशी येथील प. पू. राऊळ महाराज यांच्या स्मारक मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त खास हे शिबिर आयोजित केले आहे. ३ नोव्हेंबर रोजी पहाटे काकड आरती करून सुरुवात होणार आहे.
सकाळी ७ ते ९ वाजता राऊळ महाराज चरणी अभिषेक, पाद्यपूजा, सार्वजनिक गाऱ्हाणे, या नंतर भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ घोटगे, यांचा भजनाचा कार्यक्रम, सकाळी दहा वाजता राऊळ महाराज स्मारक मंदिरात भव्य मोफत शिबिराचे आयोजन प. पू. विनायक ( अण्णा) महाराज राऊळ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांनी केले आहे.
आरोग्य शिबिरात डॉ. एस. एन. ओझा ट्रस्ट पणजी गोवा अव्दैत चिकित्सालय पिंगुळी, डॉ. प्रशांत सामंत, टिम डिझायर फार्मा, मेनकांईड, फार्मा लि. राजेश धुरी, सोमनाथ कुडाळकर, कडून तपासणी केली जाणार आहे. या शिबिरात मॅग्नेटिक, अॅनालायझर, मशीनद्वारे शरीर तपासणी, कोणत्याही प्रकारची सुर्ई न टोचता या प्रगत उपकरणाद्वारे शरीराची सर्वसमावेशक तपासणी केली जाणार आहे शरिराच्या स्थितीबद्दल रिपोर्ट दिले जाणार आहेत.
सकाळी साडेदहा ते साडे अकरा वाजता सातेरी महिला भजन मंडळ खानयाळे यांचे भजन, बारा वाजता सातेरी केळबाय भजन मंडळ दोडामार्ग, दुपारी महाआरती, तसेच अखंड महाप्रसाद सुरूवात होणार आहे.दुपारी तीन वाजता बच्चे सावर्डे कोल्हापूर यांचे भजन, दुपारी हनुमान दामोदर भजन मंडळ भेडशी यांचे भजन, साडेचार वाजता श्री भाऊ नाईक वेतोरे यांचे सुश्राव्य किर्तन, सायंकाळी सात वाजता आरती राञी प. पू. राऊळ महाराज यांच्या पादुका पालखी भव्य पालखी सोहळा मिरवणूक ढोलताशांच्या गजरात सुर्ई होणार आहे. राञी दहा वाजता कलेश्वर दशावतार नाटय मंडळ नेरूर यांचा देवी भ्रद्राकाली नाटय प्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रम शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्याध्यक्ष विठोबा विनायक राऊत यांनी केले आहे.

शेअर करा