बँक ऑफ इंडिया कर्मचारी व माजी ग्रामपंचायत सदस्य; समाजकार्याबद्दल संत शिरोमणी रविदास महाराज समाजभूषण पुरस्काराने झाले होते सन्मानित.
मालवण,दि.२९ ऑक्टोंबर
सुकळवाड पाताडेवाडी येथील रहिवासी श्री.विजय गणपत पाताडे (वय ६०) यांचे दि.२९ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
विजय पाताडे हे बँक ऑफ इंडिया शाखा सुकळवाडचे कर्मचारी होते. यापूर्वी त्यांनी सुकळवाड ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही पाच वर्षे कार्य केले होते. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका मालवणचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. समाजाच्या कार्यात सक्रीय असल्याने त्यांना जिल्हा मंडळाचा सन २०२३ चा संत शिरोमणी रविदास महाराज समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मनमिळावू स्वभावाने अनेक माणसे जोडली होती.विविध क्षेत्रातील त्यांचा मित्रवर्ग होता.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सुकळवाड पंचक्रोशीसह अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे असा परिवार आहे.