देवगड एसटी आगारात शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर; पप्पू जायभाय अध्यक्षपदी

शेअर करा


जिल्हाध्यक्ष अमित रावले यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया; आगार व्यवस्थापकांना निवडीचे पत्र सुपूर्द

देवगड,दि.३० जून

देवगड एसटी आगारात शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेच्या वतीने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनंत (अमित) रावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पप्पू जायभाय यांची देवगड एसटी आगार अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आगार व्यवस्थापक सौरभ औंदकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


यावेळी संघटनेच्या विविध पदांवरही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत नारिंगरेकर, शरद परब, ज्ञानेश्वर मुंडे आणि शैलेश पेडणेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी जितेंद्र तेली यांची तर सहसचिवपदी रोशन मंचेकर, रुपेश गेडाम, अभिषेक वातकर आणि लक्ष्मण नागरगोजे यांची निवड करण्यात आली.


कार्याध्यक्षपदी देवगड तालुकाप्रमुख विलास साळस्कर यांची निवड करण्यात आली असून श्री पांडुरंग कोळी यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धी सचिवपदी प्रमोद मेघ शाम तर खजिनदारपदी योगेश पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून संघटनेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी व कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेअर करा