देवगड,दि.२२ ऑगस्ट
देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूल मध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या ९५ व्या पुण्यतिथीनिमित्त शाळेच्या संगीता यतन विभागामार्फत स्वरांजली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक श्री.प्रविण खडपकर, श्री. प्रमोद नलावडे, श्री. प्रसाद शेवडे, श्री. राजेंद्र हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पं. पलूसकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्वरांजली कार्यक्रमांमध्ये शाळेचे विद्यार्थी सानवी समीर मर्गज, पृथा सुशील कुमार लोके, तसेच वेद राहुल गोगटे यांनी हार्मोनियम वादन केले. त्यानंतर प्रांजली महेश कानेटकर, वेद योगेश बोभाटे यांनी शास्त्रीय गायन केले. राधा हेमंत जोशी यांनी देखील शास्त्रीय गायन केले. अभिनव उदय जोशी यांनी तबलावादन केले. त्यानंतर शाळेचे संगीतशिक्षक विषय शिक्षक श्री. यांनी शास्त्रीय गायन केले प्रसाद शेवडे यांनी शास्त्रीय गायन केले. या सर्वांना अभिनव जोशी, तबला विषय शिक्षक श्री. उमेश कोयंडे तसेच सौरभ कानेटकर यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.उमेश कोंयडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे निवेदन तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या जीवन कार्याचा आढावा सहाय्यक शिक्षक श्री. सागर कर्णिक यांनी घेतला.